श्रावण बाळ योजना 2023 | Shravan Bal Yojana Maharashtra

Shravan Bal Yojana Maharashtra

श्रावण बाळ योजना २०२३ | Shravan Bal Yojana Maharashtra

श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय ? 

श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा वृद्धांना सरकारमार्फत दर महिन्याला ४००ते ६०० रुपये भेटणार आहेत तेही त्यांच्या बँक अकाउंट मध्ये या कारणामुळे राज्यातील वृद्ध स्वावलंबी होतील.

श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना मध्ये दोन गट करण्यात आलेले आहेत.

गट अ : ज्यांचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली येते त्या कुटुंबातील स्त्री-पुरुषांना आणि वयस्कर वृद्धांना या गटामध्ये सामील करण्यात आलेले आहे.

गट ब : ज्या कुटुंबाकडे दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड नाही पण वयस्कर आहेत त्यांना सुद्धा या योजनेमध्ये सामील करण्यात आलेले आहे.

प्रत्येकाचे आई-वडील त्यांचे बाळ लहान असल्यापासून ते अगदी कितीही मोठे झाले तरीसुद्धा सतत त्यांची काळजी घेत असतात परंतु हेच लहान मुलं किंवा मुली मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांप्रती आपले असणारे कर्तव्य विसरतात आणि काहीतरी कारणे देऊन त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देतात. मग अशावेळी ज्यांची मुलं बाळ त्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा वृद्ध लोकांसाठी सरकारने श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. त्या योजनेचीच माहिती आज आपण बघणार आहे. ( Shravan Bal Yojana Maharashtra )

महाराष्ट्र राज्य हे उत्तम कल्याणकारी राज्य असून राज्य सरकारकडून दरवेळी जनतेच्या कल्याणासाठी खूप उपयोगी अशा योजना आणत असते.यावर्षी 2023 मध्ये राज्य सरकारकडून श्रावणबाळ योजना हे आलेली आहे.या योजनेचा लाभ समाजातील दुर्बल घटकांनाआर्थिक मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या म्हातारपणी आर्थिक मदत करणे जेणेकरून त्यांना आधार भेटेल या योजनेच्या अंतर्गत निराधार वृद्ध लोकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा मूळ उद्देश आहे.

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना | Absolute Namo Shetkari 2nd Installment…Read More

 

तसेच राज्य सरकार खूप सार्‍या योजना हे आणत असते. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी अर्ज कसा भरायचा हे आम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर टाकत असतो,तर यावेळी आपण बघणार आहे श्रावण बाळ योजनेसाठी कसा अर्ज करायचा, कोठे अर्ज करायचा, त्याचे लाभ काय आहेत आणि त्यासाठी कोण कोण पात्र आहे असेच खूप सार्‍या योजनांची माहिती तुम्हाला मोबाईलवर पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता.

ही योजना निराधार वयोवृद्धसाठी खूप फायदेशीर आहे. महाराष्ट्र राज्यातील 65 आणि 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना संपूर्ण राज्यात सुरू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि म्हातार वयात त्यांचे हाल कमी होण्यासाठी हे आर्थिक मदत खूप फायदेशीर ठरणार आहेत.( Shravan Bal Yojana Maharashtra )

Shravan Bal Yojana Maharashtra 2023 योजनेची उद्दिष्टे

श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वय वर्ष 65 आणि त्याच्यावरील निराधार वयोवृद्धसाठी या योजनेचा खूप फायदा होणार आहे. त्यांचे वृद्धकाळातील होणारे हाल कमी करण्यासाठी सरकार त्यांना पैशाचा स्वरूपात दर महिन्याला काही मदत करेल यातून ते स्वावलंबी बनतील आणि कोणावरही त्यांना अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.सर्वांपर्यंत हे योजना पोहोचावे आणि सर्व वयोवृद्धांनी या योजनेचा लाभ घ्यावा हे सरकारचे मूळ उद्दिष्ट आहे.

 

भारतामध्ये 8 प्रकारच्या Number Plate असतात हे तुम्हाला माहिती आहे का ?

Introducing Types of Number Plates in India | Best Info….Read More

 

श्रावण बाळ सेवानिवृत्तीवेतन योजना योजनेच्या अटी

१.अर्जदार किंवा अर्जदाराच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी खात्यामध्ये नोकरीला असल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

२.अर्जदार हे महाराष्ट्रातील रहिवासी असले पाहिजे बाहेरच्या राज्यातील वयोवृद्धांसाठी ही योजना नाही.

३.लाभार्थीकडे दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड असले पाहिजे. (BPL)

4.अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे.

5.अर्जदार किंवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  21000 पेक्षा नसावे.

श्रावण बाळ सेवानिवृत्तीवेतन योजनेचा फायदा काय आहे

१.वयस्कर लोकांना आर्थिक मदत मिळेल

२.वयस्कर लोकांना आर्थिक मदत मिळाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

३.श्रावण बाळ योजना अंतर्गत दरमहा १५०० रुपये ची मदत ही वयस्कर लोकांना केली जाईल यातून वयस्कर लोक आपल्या नेहमीच्या गरजा पूर्ण करू शकतील. ( Shravan Bal Yojana Maharashtra )

आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहे ?

1.आधार कार्ड 

2.पॅन कार्ड 

3.चालू मोबाईल नंबर किंवा कुटुंबातील सदस्याचा नंबर.

4.दारिद्र रेषेखालील रेशनिंग कार्ड (BPL)

5.लाईट बिल 

6.लाभार्थ्याचा जन्माचा दाखला 

7.पासपोर्ट Size फोटो.

8.उत्पन्नाचा दाखला

9.महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेला दाखला

श्रावण बाळ योजना महाराष्ट्र ( Shravan Bal Yojana Maharashtra )अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत.

तुम्हाला अधिकचे अजून माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयभेट शकता.

यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागेल तिथे जाऊन तुम्हाला अर्ज भरावे लागतील.

 

वाचक मित्रांनो

आम्ही या लेखांमध्ये श्रावणबाळ योजनेचे परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या शेजारील गरजू वयस्कर लोकांपर्यंत हे माहिती जरूर पोहोचवा आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घडवून आणा. तसेच यासारख्या असंख्य योजनेसाठी लगेच तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही आमच्या जॉईन करू शकता तिथे आम्ही खूप सारे अपडेट टाकत असतो.( Shravan Bal Yojana Maharashtra )

 

Leave a Comment