नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना | AbsoluteNamo Shetkari 2nd Installment

नमस्कार वाचक मंडळी

Namo Shetkari Yojana 2 Installment Date

                    नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होईल याबाबत तारीख सांगण्यात आली आहे.ज्या शेतकरी मित्रांना पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना तो कधी मिळेल तसेच नमोचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल दुसरा हप्ता येण्याची तारीख किती असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तरी पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

तर मित्रांनो केंद्र सरकारने मदत दिलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनाच राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी निधी ( Namo Shetkari Yojana 2 Installment Date ) या योजनेसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 93 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाहीये.सध्या राज्य शासनाकडून दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन हे सुरू आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana

 

हे सुद्धा वाचा :- Mukhyamantri Vayoshri Yojana | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! मुख्यमंत्री वयोश्री योजना, अर्ज करा

नमो चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी राज्यसरकारने केंद्र शासनाकडे त्यांनी ज्यांनी पंधरावा हप्ता भरलेला आहे अशा शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर या माहितीची पडताळणी करून महाआयटी कडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे मित्रांनो आधार संलग्न बँक खात्त्यातच शेतकऱ्यांचा निधी पाठवला जाईल अशी सूचना केंद्राने केली होती, परंतु चौदावा हप्ता देताना हे अट शिथिल करण्यात आलेली आहे. ( Namo Shetkari Yojana 2 Installment Date )

यामुळे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळाला.परंतु 15 ऑक्टोबरला पहिले अट पुन्हा लागू केली, म्हणजे जर तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड च लिंक नसेल तर तुमच्या बँक अकाउंटला निधी येणार नाही.शेतकऱ्यांनी बँक अकाउंटला जर आधार कार्ड लिंक केले असेल तरच पंधराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला येतील असं शासनाने सांगितलेलं आहे,  तसेच15 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा सुद्धा करण्यात आलेले आहे.

Key Points

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना
विभागकृषी व महसूल विभाग
लाभार्थी संख्या८५ लाख ६० हजार शेतकरी
लाभ रक्कमवार्षिक ६००० रु.
नोंदणी पद्धतऑनलाईन

 

 

 

स्वाधार योजना 2023 संपूर्ण माहिती | Swadhar Yojana 2023 Good And Complete

Information….Read More

Namo Shetkari Yojana 2 Installment Date

त्यामुळे फक्त 84 लाख 67 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळाला आहे.ज्या शेतकरी मित्रांनी बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केले नाही असे 90 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना पंधरावा हप्त्याचे दोन हजार रुपये भेटलेले नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंट आधार कार्ड ची लिंक करून घ्या.जर तुम्ही बँक अकाउंट आधार कार्ड ची लिंक केले तर तुमची राहिलेली रक्कम हे तुमच्या बँक अकाउंटला जमा होऊन जाईल,अशी सुविधा केंद्र सरकारने ठेवलेले आहे असे सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे तर असे सर्व सुविधा असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं अकाउंट लिंक करणे.तर या कारणामुळे नमो शेतकरी निधी योजनेचा आणि प्रेम किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट वर जमा झालेला नाही तर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड चे लिंक करून घ्या म्हणजे तुमचे सर्व हप्ते जमा होऊन जातील. ( Namo Shetkari Yojana 2 Installment Date )

महसूल विभागाकडे आधी पीएम किसान सन्मान निधी योजनेची जबाबदारी होती.शेतकऱ्यांच्या भूमि अभिलेख नोंदणी अद्यावत करा, शेतकऱ्यांची बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या, तसेच पात्र शेतकऱ्यांच्या E-KYC म्हणजेच अर्जदाराची वैद्य ओळख करून घ्या अशा महत्त्वाच्या तीन सूचना केंद्र शासनाने राज्याला दिल्या होत्या परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आणि यामुळे या तीन अटी पूर्ण करणारे केवळ 70 लाख शेतकरी राज्यात पात्र ठरले होते सूत्रांच्या म्हणण्यानुसार पी एम किसान योजनेची जबाबदारी ही राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्येही E-KYC व आधार संलग्न अभियान राबविण्यात आले.या कामांमध्ये क्षेत्रीययंत्रणेने शेतकऱ्यांच्या गावागावा मध्ये शेत शिवारात भेट देत अटींची पूर्तता करून घेतली त्यामुळे लाभार्थी संख्या वाढली आहे आता लाभार्थी संख्या ही 70 लाखाहून थेट 84.50 लाख पुढे गेली.

Namo Shetkari Yojana 2 Installment Date

डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत नमो शेतकरी सन्मान योजनेचा ( Namo Shetkari Yojana 2 Installment Date ) दुसरा हप्ता या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. तरी अजून बरेच असे शेतकरीमित्र पात्र आहेत परंतु ज्यांनी अजून त्यांचे बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले नाहीये त्यामुळे त्यांना पिएम किसानचा 14 वा हप्ता तर मिळाला नाही परंतु नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता भेटणार नाही या लाभापासून ते वंचित राहू शकतात त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक करून घ्यावी जेणेकरून डिसेंबर अखेरीस येणारा दुसरा हप्ता त्यांना मिळू शकेल.तर अशाप्रकारे राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येईल तोही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात. तर शेतकरी मित्रांनो या प्रकारे तुम्ही नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये घेऊ शकता तर हे पोस्ट तुम्हाला आवडले असेल तर हे पोस्ट नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रपरिवार सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि त्यांना सुद्धा याचा हप्ता भेटून जाईल आणि अशाच नवनवीन योजनेचे माहिती मिळवण्यासाठी आमचा टेलीग्राम चा ग्रुप , व्हाट्सअप चा ग्रुप तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या तिथे पण आम्ही खूप सारे अपडेट टाकत असतो.( Namo Shetkari Yojana 2 Installment Date )

खाली दिलेल्या टेलिग्राम च्या आयकॉन वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

Leave a Comment