स्वाधार योजना 2023 संपूर्ण माहिती | Swadhar Yojana 2023 Good And Complete Information

 

 

स्वाधार योजना 2023 संपूर्ण माहिती | Swadhar Yojana 2023 Complete Information

वाचक मंडळी

 या लेखांमध्ये आपण स्वाधार योजना या योजनेचे परिपूर्ण माहिती घेणार आहोत जसे की या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या योजनेसाठी काय पात्रता आहे या योजनेमधून काय फायदा होणार आहे कोणाचा फायदा होणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व विषयाची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत अशा अनेक योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता

भारत हा एक विकसनशील देश आहे भारतामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने विकास होत आहे.औद्योगिक क्षेत्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये विकासाप्रमाणे कुशल मनुष्यबाळाची म्हणजेच स्किल्ड वर्कर ची गरज भासत आहे.त्यामुळे यासाठी जे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Swadhar Yojana 2023)

परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या नवबौद्ध व अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ आधार भेटणार आहे.काही वेळा काय होतंय शिक्षण पूर्ण करण्यासाठी जो वस्तीग्रहाचा खर्च असतो आणि तेथील राहण्याचा किंवा जेवणाचा जो खर्च असतो शैक्षणिक खर्च असतो तो पूर्ण न करता येणे किंवा या कारणामुळे काय विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडून देतात तर हे सर्व होऊ नये यासाठी स्वाधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत जेवण राहण्याची सोय आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी व सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेली आहे.(Swadhar Yojana 2023)

या अनुदानाची रक्कम थेट अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल यासाठी तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

Application Form Download Link :- Click Here

स्वाधार योजना 2023 ची वैशिष्ट्ये

1.महाराष्ट्र शासनाने 2016 -17 साली अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यासाठी ही योजना करण्यात आली.

2.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.(Swadhar Yojana 2023)

3.या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होतील

4.जर विद्यार्थ्याला समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वस्तीगृहामध्ये ऍडमिशन नाही भेटले तर त्याला या योजनेमार्फत फायदा होऊ शकतो.

5.जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेत असतात तेव्हा काय विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती चांगली नसते तेव्हा त्यांना पैशाची चिंता भेडसावत असते त्यामुळे ते काही वेळा शिक्षण मध्ये सोडून जातात तर त्यांनी हे शिक्षण मध्येच सोडून जाऊ नये यासाठी ही योजना एक वरदान आहे.(Swadhar Yojana 2023)

स्वाधार योजना 2023 च्या अटी.

1.विद्यार्थ्याला दहावी, बारावी, पदविका, पदवी परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक आहे.

2.आणि जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याला पन्नास टक्के गुण असणे बंधनकारक आहे.

3.विद्यार्थ्यांच्या पालकाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावा.

4.विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

5.सदरचा विद्यार्थी हा बाहेरगावी शिकत असावा स्थानिक संस्थेमध्ये शिकणारा स्थानिक विद्यार्थी नसावा त्यासाठी हे योजना नाही.

6.गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांचे निवड करण्यात येईल 

7.विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाचे संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही.

8.विद्यार्थ्यांनी आपले बँक अकाउंट आधार कार्ड चे संलग्न करून घेणे आवश्यक आहेत.

Swadhar Yojana 2023 योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गाच्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे अनुदान भेटेल. (Swadhar Yojana 2023)

मिळणारा भत्तामुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या सारख्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदान रक्कम

इतर महसूल विभागीय शहरातील वउर्वरित क वर्ग महानगरपालिकाक्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाअनुदान रक्कम

उर्वरित क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम
भोजन भत्ता32000/-रुपये28000/-रुपये25000/-रुपये
निर्वाह भत्ता8,000/- रुपये8,000/- रुपये6,000/- रुपये
निवास भत्ता20,000/- रुपये15,000/- रुपये12,000/- रुपये
एकूण भत्ता60,000/- रुपये51,000/- रुपये43,000/- रुपये

 

टीप :-वरील अनुदानाच्या रकमेच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 2 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात दिली जाईल.

भारत हा एक विकसनशील देश आहे भारतामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने विकास होत आहे.औद्योगिक क्षेत्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये विकासाप्रमाणे कुशल मनुष्यबाळाची म्हणजेच स्किल्ड वर्कर ची गरज भासत आहे.त्यामुळे यासाठी जे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Swadhar Yojana 2023)

स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता

अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र असतील

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Swadhar Yojana 2023)

1.जातीचे प्रमाणपत्र

2.महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र

3.आधार कार्ड चे प्रत

3.बँक पासबुक झेरॉक्स

4.तहसीलदारांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला केव्हा वडील यांचा सोळा नंबरचा फॉर्म जर नोकरीला असतील तर.

5.जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र

6.बारावी किंवा पदवी परीक्षेचे मार्कशीट

7.महाविद्यालयाचे बोनाफाईड

8.विद्यार्थी BPL कुटुंब धारक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

9.विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र

हे सर्व प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहे जेव्हा तुम्ही अर्ज कराल.

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता.

Download Link :- Click Here

मित्रांनो हे जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांचे शिक्षण ते एकदम पूर्णपणे पूर्ण करू शकतील आणि आमचा व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन पण इथे दिसत असेल तर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा येथे आम्ही खूप साऱ्या प्रकारचे अपडेट टाकत असतो आणि आमचा टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करा तिथे Job Related आम्ही पोस्ट टाकत असतो.

खाली दिलेल्या टेलिग्राम च्या आयकॉन वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

 

Leave a Comment