Rooftop Solar Yojana 2024 Maharashtra | तुमच्या घरावर सोलर यंत्र बसवा आता सरकार पैसे देणार….

Rooftop Solar Yojana Maharashtra Mahiti Marathi 

तुमच्या घरावर सोलर बसवा आता सरकार पैसे देणार….

2024 मध्ये सरकारने एका नवीन योजनेमध्ये अमुलाग्र बदल केलाय आणि त्या बदलामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सोलर बसवणं शक्य होणार आहे, वाढते वीज बिलाच्या प्रश्नामुळे सोलर बसवण्याची प्रत्येकाला इच्छा असते पण सोलर सेट बसवण्यासाठी जो उभारणीचा खर्च आहे तो इतका प्रचंड असतो की त्यामुळे सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बसत नाही. (Rooftop Solar Yojana)

यामुळेच सरकारजी  एक जुनी योजना होती त्या योजनेमध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे आणि त्या बदलामुळे तब्बल 40 ते 50 टक्के पर्यंत अनुदान तुम्हाला सरकार मार्फत सोलर सिस्टिम बसवण्यासाठी मिळणार आहे. तुमची सोलर सिस्टीम एक किलो किंवा  दहा किलो वॅट क्षमतेपर्यंत जरी असली तरी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे. ती योजनाच आहे क्रांतिकारी की ज्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला लाईटची चिंता नाही, लाईट बिलाची देखील चिंता नाही. सोलर सिस्टिम बसवून घ्या सरकार द्वारे अनुदान मिळते आणि लाईट बिलाची चिंता आता आयुष्यभर करण्याची गरज नाही खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर या माहिती पत्रामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की सर्वसामान्य माणसाला सोलर सिस्टिम बसवण्यासाठी सरकार किती सबसिडी देत आहे. योजना काय आहे डिटेल माहिती घेणार आहोत. (Rooftop Solar Yojana)

Rooftop Solar Yojana Highlights

योजनेचे नावसोलर रूफटॉप योजना 2023
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन
व्दारा सुरुवातकेंद्र सरकार
योजनेची तारीख2016
लाभार्थीसंपूर्ण देशातील नागरिक
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
उद्देश्यपारंपारिक विजेवर अवलंबन कमी करून अक्षयसौर उर्जेचा वापर समाजात वाढविणे
विभागनवीन आणि नवीनीकरण उर्जा मंत्रालय
लाभसोलर रूफटॉप यंत्रणेसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य
श्रेणीसबसिडी योजना

 

Rooftop Solar Yojana

या 7 कागदपत्रांच्या द्वारे जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करता येणार | Land Ownership Documents

 

 

 

योजना जुनीच आहे पण नवीन असे काही बदल याच्यामध्ये सरकार मार्फत करण्यात आलेले आहे की ज्यामुळे यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला याचा फायदा होणार आहे. दर महिन्याला प्रचंड प्रमाणात लाईट बिल येतं आणि त्याच्यापासून वाचायचा असेल तर सोलर बसवणे ही एकमेव पर्याय आज त्याला उपलब्ध आहे. (Rooftop Solar Yojana) पण सोलर बसवायला खर्च भरपूर येतो त्यामुळे सामान्य माणूस त्याच्यापासून मागे हटत होता.

सोलर सिस्टिम बसवण्याचं जे काय प्रमाण आहे ते अतिशय कमी होत होतं व त्याच पार्श्वभूमीवर जवळपास 30 जुलै 2022 मध्ये आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना आणली जी सोलर सिस्टिम तुमच्या घरावर बसवण्यासाठी चांगल्या प्रमाणात अनुदान देत होती या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल तीनशे कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत आणि 53 हजार लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे.

योजना मुळातच फार क्रांतिकारी होती. त्यामुळे सोलर बसवण्याचं प्रमाण देखील वाढलं पण पाहिजे तेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलं नाही कारण की झालं काही योजना 22 मध्ये आणण्यात आली पण रेट भरपूर वाढत गेले सोलर पॅनलचे रेट वाढले वायरिंग चे रेट बसवण्याचे रेट भरपूर वाढले आणि अनुदान त्या पटीत वाढलेलं नव्हतं. त्यामुळे अजून त्या ठिकाणी सोलर बसवण्याचं प्रमाण थोडसं कमी व्हायला लागलं होतं आणि मग सरकारना अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या योजनेमध्ये एक क्रांतिकारी बदल केला आहे. आणि त्यामुळे ही जी काय सबसिडी आहे ती देखील फार चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ज्यामुळे सोलर बसवणं आता प्रत्येकाला शक्य होणार आहे या योजनेचे नाव आहे solar rooftop yojana .

सोलर रूफटॉप योजना अंतर्गत सोलर रूफटॉप सिस्टीमची किंमत 

सोलर रूफटॉप योजना 2022 महाराष्ट्र अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सोलर रूफटोप यंत्रणेची पाच वर्षाच्या देखभाल खर्चासहित किंमत खालीलप्रमाणे प्रमाणे असेल.(Rooftop Solar Yojana)

सोलर रूफटॉप सिस्टीमकिमंत
1 किलो वाट46,820/- रुपये
1 ते 2 किलो वाट42,470/- रुपये
2 ते 3 किलो वाट41,380/- रुपये
3 ते 10 किलो वाट40,290/- रुपये
10 किलो वाट ते 100 किलो वाट37,020/-

सोलर रूफटॉप योजना उद्दिष्ट Rooftop Solar Yojana

नैसर्गिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला सर्वसामान्य माणसाला जे काय अनुदान देणं ही एकमेव त्याच्यामध्ये उद्दिष्ट होत.यामध्ये तुम्ही वयक्तिक वापरासाठी 1 KW पासून 3 KW पर्यंत तसेच १० KW  पर्यंत जी काय सबसिडी आहे याच्यामार्फत देण्यात येत होती .आता या योजनेअंतर्गत पूर्वी  1 KW ते  3 KW साठी 40% म्हणजे तुमच्या सोलर सिस्टिमच्या 40% पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सबसिडी मिळत होती.

तेच जर तुमचा सोलर प्लांट हा जर 3 KW ते  १० KW मध्ये असेल तर तुम्हाला २० टक्के तुमच्या किमतीच्या सबसिडी मिळत होती. काय स्पेशल राज्य आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी सबसिडी जास्त असायची आणि महाराष्ट्र सारखे जनरल राज्यासाठी कमी सबसिडी असायचे.

पण आता काय झाले की आता ज्या का आधारभूत किमती आहे किंवा जे काही वाढलेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी सरकारने देखील याची जी किंमत पूर्वी धरायची ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच तुमचा अनुदान देखील वाढलेला आहे. आता सुधारित किमतीनुसार जर तुम्ही १ KW ते 3KW सोलर सिस्टीम जर बसवत असाल तर तुमच्यासाठी 40 टक्के अनुदान आहे.

जे पूर्वी तुम्हाला 14058/- रुपये प्रति KW मिळायचे ते आता १८०००/- रुपये मिळणार आहेत म्हणजेच 3KW साठी तुम्हाला पूर्वी 43 हजार 674 रुपये मिळायचे तेच आता तुम्हाला 54 हजार रुपये मिळणार आहेत. आणि ते जर तुमची सोलर सिस्टिम दहा किलो वॅट पर्यंत असेल तर एक ते तीन किलो वॅट पर्यंत  तुम्हाला अठरा हजार रुपये भेटणार आहेत आणि तिथून पुढे नऊ हजार रुपये प्रति किलो  वॅट मिळतील.(Rooftop Solar Yojana)

फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ५ जानेवारी 2024 नंतरचे जे लोक अर्ज करतील किंवा ज्यांच जुने अर्ज आहे त्याचं जर अर्ज 5 जानेवारी नंतर जर एक्सेप्ट झालं तर त्यांना या वाढीव दराचा लाभ मिळणार आहे.

सोलर रूफटॉप योजना अंतर्गत आवश्यक असलेली कागदपत्रे 

या योजनेच्या संबंधित लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील 

  • अर्जदाराचा मोबाइल क्रमांक 
  • उमेदवाराचे आधार कार्ड 
  • उमेदवाराच्या घराचे मालकी हक्क कागदपत्रे 
  • वर्तमान विजेचे बिल 
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षा पासून रहिवासी असणे आवश्यक आहे 
  • पासपोर्ट साईझ फोटो 
  • उमेदवाराच्या कुटुंबाचा उत्पन्न दाखला (Rooftop Solar Yojana)

सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 

सोलर रूफटॉप योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे चरणांचे अनुसरण कराव लागेल  

  • या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट असलेल्या राष्ट्रीय पोर्टलला भेट द्यावी लागेल solarrooftopgov.in Rooftop Solar Yojana

Yojananews whatsapp group

Disclaimer

प्रिय वाचक मित्रहो, या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर प्रदान केलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे, अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी अद्यावत बातम्या आणि राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित प्रमाणिक माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी

 

Leave a Comment