Rooftop Solar Yojana Maharashtra Mahiti Marathi
तुमच्या घरावर सोलर बसवा आता सरकार पैसे देणार….
2024 मध्ये सरकारने एका नवीन योजनेमध्ये अमुलाग्र बदल केलाय आणि त्या बदलामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सोलर बसवणं शक्य होणार आहे, वाढते वीज बिलाच्या प्रश्नामुळे सोलर बसवण्याची प्रत्येकाला इच्छा असते पण सोलर सेट बसवण्यासाठी जो उभारणीचा खर्च आहे तो इतका प्रचंड असतो की त्यामुळे सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बसत नाही. (Rooftop Solar Yojana)
यामुळेच सरकारजी एक जुनी योजना होती त्या योजनेमध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे आणि त्या बदलामुळे तब्बल 40 ते 50 टक्के पर्यंत अनुदान तुम्हाला सरकार मार्फत सोलर सिस्टिम बसवण्यासाठी मिळणार आहे. तुमची सोलर सिस्टीम एक किलो किंवा दहा किलो वॅट क्षमतेपर्यंत जरी असली तरी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे. ती योजनाच आहे क्रांतिकारी की ज्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला लाईटची चिंता नाही, लाईट बिलाची देखील चिंता नाही. सोलर सिस्टिम बसवून घ्या सरकार द्वारे अनुदान मिळते आणि लाईट बिलाची चिंता आता आयुष्यभर करण्याची गरज नाही खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर या माहिती पत्रामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की सर्वसामान्य माणसाला सोलर सिस्टिम बसवण्यासाठी सरकार किती सबसिडी देत आहे. योजना काय आहे डिटेल माहिती घेणार आहोत. (Rooftop Solar Yojana)
Rooftop Solar Yojana Highlights
योजनेचे नाव | सोलर रूफटॉप योजना 2023 |
अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन |
व्दारा सुरुवात | केंद्र सरकार |
योजनेची तारीख | 2016 |
लाभार्थी | संपूर्ण देशातील नागरिक |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
उद्देश्य | पारंपारिक विजेवर अवलंबन कमी करून अक्षयसौर उर्जेचा वापर समाजात वाढविणे |
विभाग | नवीन आणि नवीनीकरण उर्जा मंत्रालय |
लाभ | सोलर रूफटॉप यंत्रणेसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य |
श्रेणी | सबसिडी योजना |